

accident
sakal
पुणे - शहर आणि उपनगरांमध्ये झालेल्या तीन रस्ते अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये एका ज्येष्ठ महिलेसह दुचाकीस्वाराचा समावेश आहे. पुणे-सातारा रस्ता, बाणेर फाटा, केसनंद परिसरात या घटना घडल्या असून, संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.