Pune Accidents: तीन विविध अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू; दोन जखमी
Pune News: पुण्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झाला असून दोन लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. लोहगाव, पाटील इस्टेट आणि मगरपट्टा रस्त्यावर ही दुर्घटना घडली.
पुणे : शहरात भरधाव वाहनांच्या धडकेने तीन वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू झाला असून, दोन लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. लोहगाव, पाटील इस्टेट आणि मगरपट्टा रस्त्यावर घडलेल्या या घटनांनी पुन्हा एकदा शहरातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.