जुन्नरकरांनो सावधान, कोरोनाची वाटचाल शतकाकडे 

corona
corona

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील कोरोनाबधितांची शंभरीकडे वाटचाल सुरू असून, कोरोनाबाधितांच्या संपर्कातील तीन जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ९१  झाली असल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले. 

जुन्नर तालुक्यातील धालेवाडी येथील दोन, तर वारूळवाडीतील एक, अशा एकूण तीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ३२, तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५६ झाली आहे. औरंगपूर, मोकासबाग व पिंपळगाव- आर्वी येथील प्रत्येकी एक, अशा तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  आज उंब्रज येथील दोन रुग्णांना घरी सोडण्यात आले.

जुन्रर तालुक्यातील गावनिहाय उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे : बल्लाळवाडी- ५, उंब्रज नंबर एक- २,  निरगुडे- ३, पिंपळवंडी- ३, खानगाव- २, नारायणगाव- ४, धालेवाडी- ३, वारूळवाडी, आळेफाटा, पिंपळगाव जोगा, जुन्नर, पिंपळगाव- आर्वी, नेतवड, धनगरवाडी, उंचखडक- राजुरी, बोरी बुद्रुक व शिरोलीतर्फे आळे येथे प्रत्येकी एक रुग्ण .
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com