चेन्नईचे तीन विद्यार्थी मुळशी धरणात बुडाले ; मृतदेह शोधण्यात यश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

चेन्नई येथील इसीएस मॅट्रिक्‍युलेशन शाळेचे हे विद्यार्थी होते. मंगळवारी दुपारी एक आठवड्याच्या उन्हाळी शिबिरासाठी शाळेचे वीस विद्यार्थी व चार शिक्षक आले आहेत. त्यामध्ये तीन महिला व एक पुरुष आहे. कातरखडक येथे जॅकलीन स्कूल ऑफ थॉट स्वयंसेवी संस्था आहे.

भुकूम : कातरखडक (ता. मुळशी) येथील बंधाऱ्यामध्ये चेन्नई येथील तीन विद्यार्थी बुडाले. त्यातील एकाचा मृतदेह काल (बुधवार) मिळाला तर शोधमोहिमेनंतर यातील दोघांचे मृतदेह शोधण्यात एनडीआरएफचे पथक, अग्निशमनातील जवान आणि पोलिसांना आज (गुरुवार) यश आले. 

उन्हाळी सुटीच्या शिबिरासाठी वीस विद्यार्थी मंगळवारी आले होते. बुधवारी दुपाची चार वाजता ही घटना घडली. येथील बंधाऱ्यामध्ये तेरा वर्षांचा दिनेश राजा, संतोष के. आणि सर्वण्णा हे विद्यार्थी बुडाल्याची माहिती मिळाली. यातील एकाचा मृतदेह काल मिळाला होता. त्यानंतर यातील दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात होते. शर्थीच्या प्रयत्नानंतर उर्वरित दोन मृतदेहही पाण्याबाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले.

चेन्नई येथील इसीएस मॅट्रिक्‍युलेशन शाळेचे हे विद्यार्थी होते. मंगळवारी दुपारी एक आठवड्याच्या उन्हाळी शिबिरासाठी शाळेचे वीस विद्यार्थी व चार शिक्षक आले आहेत. त्यामध्ये तीन महिला व एक पुरुष आहे. कातरखडक येथे जॅकलीन स्कूल ऑफ थॉट स्वयंसेवी संस्था आहे. येथील स्थानिक शंकर चव्हाण व दिवाकर पांड्या ही संस्था चालवितात. त्यांच्याकडे हे विद्यार्थी आले आहेत.

दुपारच्या वेळी सर्व विद्यार्थी व शिक्षक कातरखडक येथील बंधाऱ्याजवळ गेले. त्या वेळी तीन विद्यार्थी पाण्यामध्ये उतरले होते. पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही. दरम्यान शिक्षक व विद्यार्थ्यांनी मदतीसाठी ग्रामस्थांना हाका मारल्या. स्थानिक ग्रामस्थ, ग्रामसुरक्षा दल व पोलिसांच्या सहकार्याने एका मुलाचा मृतदेह सापडला. तर आज इतर दोघांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. 

Web Title: three student of chennai drown in dam in katarkhadak village mulshi dam