
पुणे : वरिष्ठांकडून नेमून दिलेले चौक सोडून दुसऱ्याच ठिकाणी वाहनचालकांवर घोळक्याने कारवाई करणाऱ्या वाहतूक शाखेतील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले. घटनास्थळी पाहणी आणि अहवालानंतर प्रभारी पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी ही कारवाई केली.