हृदयद्रावक घटना! क्रेनच्या धडकेत आईनं गमावलं तिचं ३ वर्षाचं लेकरू

Accident
Accident

हडपसर (पुणे) : वानवडी येथील संविधान चौक येथे रस्ता ओलांडणाऱ्या आई आणि तीन वर्षाच्या मुलाला भरधाव वेगात जाणाऱ्या क्रेनने धडक दिली. या अपघातात तीन वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाली आहे. ही घटना रविवारी (ता.५) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. भरधाव क्रेनने दिलेल्या धडकेमुळे एका आईने आपलं तीन वर्षाचं लेकरू गमावलं.

याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष जाधव (वय- ३ रा. वानवडी) असे मृत बालकाचे नाव आहे. तर रेखा भारत जाधव (वय २२) असे जखमी आईचे नाव आहे. क्रेन चालक अर्जुन श्रीराम धुलारी विश्वकर्मा (वय २० रा. उंड्री चौक, कोंढवा) याला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. 

क्रेन गंगा सँटेलाईट या मार्गावरून संविधान चौकाकडे येत होती, आई आणि मुलगा रस्ता ओलांडत होते. तेवढ्यात क्रेनने धडक दिली. यामध्ये मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर आई जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती वानवडी बाजार पोलीस चौकीचे सहायक पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र दिवेकर यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com