पुणे - रविवार पेठेतील एका जुन्या वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावरील अरुंद गॅलरीत एक गाय अडकली होती. गाईला ना खाली येता येईना, ना हालचाल करता येईना. परंतु अग्निशामक दलाच्या जवानांनी सुमारे साडेचार-पाच तास शर्थीचे प्रयत्न करून क्रेनच्या मदतीने गाईची सुखरूप सुटका केली.