Shri Tuljabhavani Mata Palang
sakal
जुन्नर - जुन्नर शहरात श्री तुळजाभवानी माता पलंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी सुरू आहे. दररोज हजारोंच्या संख्येने पलंगाच्या दर्शनासाठी शहर व पंचक्रोशीतील नागरिक गर्दी करत असल्याचे चित्र आहे. पलंगोत्सवानिमित्ताने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.