
निमगाव केतकी : चैतन्य, भक्ती आणि उल्हास यांचा आविष्कार घडवणाऱ्या बेलवाडीच्या रिंगणात वैष्णवांनी ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषांनी अवघं आसमंत दुमदुमून टाकलं. विण्याचा झंकार, टाळ-मृदंगाचा गजर आणि भगव्या पताकांच्या लयीत अश्वांची नेत्रदीपक दौड पार पडली. हा सोहळा भक्तिमय आनंदाचं अप्रतिम दर्शन घडवणारा ठरला. दिवसभर उन्हाची तिरीप होती. सोबतीला वारा असल्याने वाटचाल सुखकर झाली.