

शिरजगावकसबा : येथे मंगळवारी वन विभागाच्या पथकाने राबविलेल्या मोहिमेत ‘ट्रँक्विलायझर गन’ने वाघिणीस बेशुद्ध करून जेरबंद केले.
(फोटो क्रमांक ःAVT26A06915)
-----------------------------------------------
युवतीसह शेतकऱ्याला
मारणारी वाघीण जेरबंद
अमरावतीतील शिरजगाव कसबा येथील थरार
सकाळ वृत्तसेवा
शिरजगावकसबा (जि. अमरावती), ता. ७ : चांदूरबाजार तालुक्यात सोनोरीत रविवारी (ता. ६) युवतीला व सोमवारी (ता. ७) शिरजगावकसबा येथे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याला ठार करणाऱ्या नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यात यश आले आहे. वन विभागाने सुरू केलेल्या शोधमोहिमेनंतर सायंकाळी ‘ट्रँक्विलायझर गन’चा वापर करून वाघिणीला बेशुद्ध करून ताब्यात घेण्यात आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला. वाघिणीला नागपूरला हलविले आहे.
वाघिणीने उर्मिला इवणे (वय २२, सोनोरी शिवार,ता.चांदूरबाजार) या तरुणीवर रविवारी हल्ला करून तिला ठार केले होते. त्यानंतर देऊरवाडा गावात सोमवारी (ता. ७) सकाळी पहाटेच्या सोमतीर्थ भागातील जनावराच्या गोठ्यातील गाईला ठार केले, दुसऱ्या गाईला जखमी केले होते. त्यानंतर वाघिणीने मार्कंडा जंगलातून शिरजगावकसबा व कालाटोला जंगलात प्रवेश केला. सोमवारी (ता. ७) दुपारी शेतात काम करीत असलेल्या दिनेश शंकरराव आवारे (वय ५२, केनीपुरा, शिरजगावकसबा) या शेतकऱ्यावर हल्ला करून त्याला ठार केले. शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांनी जंगलात गर्दी केली होती. सोमवारी वन विभागाच्या चंद्रपूर, नागपूर, पुणे, अमरावती या संयुक्त पथकाने वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद केले. ती बेशुद्ध झाल्याची खात्री पटताच पिंजऱ्यात टाकून घटनास्थळावरून हलविले.
------
भांबोरा येथेही वाघिणीचा बळी?
२७ ऑगस्ट २०२६ रोजी भांबोरा (ता. मोर्शी) या गावात एका व्यक्तीवर वन्य प्राण्याने हल्ला करून ठार केले होते. हा हल्लासुद्धा बिबट्या किंवा वाघाने केल्याचा आरोप नागरिकांनी केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.