

High Alert in Hadapsar: Timer Bomb Found Inside Private Hospital Bathroom
Sakal
हडपसर : हडपसर परिसरातील एका खासगी रुग्णालयासमोर टायमर बॉम्बसदृश संशयास्पद वस्तू आढळून आल्याने परिसरात काही काळ मोठी खळबळ उडाली. आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना समोर आली. पोलिसांसह बॉम्ब शोधक व नाशक पथक तातडीने घटनास्थळी दाखल होवून संबंधित वस्तू ग्लायडिंग सेंटर येथील मैदानात नेऊन निकामी केली. नागरिकांमध्ये यावेळी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.