Crime
पुणे - हडपसर परिसरात बनावट कागदपत्रांद्वारे बेकायदेशीर बांधकाम करून नागरिकांकडून लाखो रुपयांचा मोबदला वसूल करणाऱ्या रिझवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण आणि त्याच्या टोळीतील साथीदारांवर काळेपडळ पोलिसांनी मंगळवारी (ता. ७) धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी आरोपींची बॅंक खाती गोठवली असून, अनधिकृत बांधकामे तोडण्याची कारवाईही सुरू केली आहे.