‘क्‍यूआर कोड’मुळे फूड ऑर्डर टचलेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

food

ग्राहक आणि हॉटेल व्यावसायिकांची ही अडचण सोडविण्याची पुण्यातील ‘टेकमेनस्टे सॉफ्टवेअर प्रा. लि.’ कंपनीने ‘टीएमबिल’ सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ग्राहकांसाठी स्पर्श विरहित आणि हॉटेलसाठी स्वतःचे ऑनलाइन प्लॅटफॉर्म बनविले आहे. 

‘क्‍यूआर कोड’मुळे फूड ऑर्डर टचलेस

पुणे - कोरोनाचा वाढता संसर्ग कमी करायचा असेल तर अनावश्‍यक स्पर्श टाळणे गरजेचे आहे. मात्र एखाद्या हॉटेलमध्ये पार्सल घेण्यासाठी गेल्यानंतर तेथील मेन्यू कार्ड पाहणे, पैसे देणे अशा कामांसाठी अनेक ठिकाणी स्पर्श होतो. तसेच एखादी ऑनलाइन ऑर्डर आल्यानंतर त्याच्या व्यवस्थापनासाठी हॉटेल चालकांना पैसे मोजावे लागतात. ग्राहक आणि हॉटेल व्यावसायिकांची ही अडचण सोडविण्याची पुण्यातील ‘टेकमेनस्टे सॉफ्टवेअर प्रा. लि.’ कंपनीने ‘टीएमबिल’ सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ग्राहकांसाठी स्पर्श विरहित आणि हॉटेलसाठी स्वतःचे ऑनलाइन प्लॅटफॉर्म बनविले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एखादी वस्तू घेण्यासाठी ग्राहक जेव्हा हॉटेल, रेस्टॉरंट्‌स, बार, कॅफे, आइस्क्रीम पार्लर, बेकरी, केक शॉप्स, खाद्यपदार्थांची इतर दुकानांत गेल्यानंतर आवडीचा पदार्थ घेण्यासाठी मेन्यूकार्ड बघतो. त्यासाठी होणारा स्पर्श टाळण्यासाठी या स्टार्टअपने क्‍यूआर कोड उपलब्ध करून दिला आहे. खाद्यपदार्थांच्या विक्रीच्या ठिकाणी लावलेला क्‍यूआर कोड स्कॅन केल्यानंतर तेथील मेन्यूकार्ड मोबाईलमध्ये पाहायला मिळते. तेथून ऑर्डर करून त्यांचे पैसे ऑनलाइन देता येतात. ऑर्डर तयार झाल्यानंतर ती मिळेपर्यंत ग्राहकाला कोणत्याही ठिकाणी स्पर्श करावा लागत नाही. ऑनलाइन ऑर्डरमध्ये अशीच यंत्रणा या स्टार्टअपने निर्माण केली असून ती क्‍लाऊड बेस्ड टेक्‍नॉलॉजीच्या माध्यमातून काम करते. राहिल शेख यांनी ‘टेकमेनस्टे सॉफ्टवेअर प्रा. लि.’ची स्थापना केली असून नीलेश गायकवाड त्यात सहसंस्थापक म्हणून रुजू झाले. राहिल व नीलेश यांनी पुणे विद्यापीठातून बीटेकची पदवी पूर्ण केली आहे. टीएमबिलचा वापर नऊ देशांमधील तीन हजार हॉटेल करीत आहेत. स्टार्टअपला यावर्षी दोन कोटींच्या महसुलाची अपेक्षा आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हे स्टार्टअप नेमके करते काय?
    क्‍यूआर कोडच्या वापरातून स्पर्शविरहित ऑर्डर
    हॉटेलमधील साठ्याचे व्यवस्थापन 
    ग्राहकांची आवड व प्रतिक्रियांद्वारे डेटानिर्माती
    हॉटेलला स्वतःचे ऑनलाइन प्लॅटफॉर्म बनवता येते
    सॉफ्टवेअरद्वारे व्यवस्थापनात सुटसुटीतपणा

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

साठ्याचेही होते व्यवस्थापन  
खाद्यपदार्थ बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अनेक वस्तू खराब झाल्यानंतर त्यांचे नोटिफिकेशन टीएमबिल देते. तसेच हॉटेलात विविध वस्तूंचा किती साठा उपलब्ध आहे, याची रिअल टाइम माहिती देते. कच्चा माल किती व कोणाकडून आणला, त्यांचे किती पैसे द्यायचे आहे, याचे व्यवस्थापन करते. त्यामुळे दुकानदारांना स्वतः या गोष्टी लक्षात किंवा लिहून ठेवाव्या लागत नाहीत.