Mohan Bhagvat Remark: पापक्षालन करायचं म्हणजे चूक केल्याचं मान्य केल्यासारखं - आनंद दवे

मोहन भागवतांच्या विधानाचा ब्राह्मण महासंघाकडून निषेध
Mohan Bhagvat_Aanad Dave
Mohan Bhagvat_Aanad Dave
Updated on

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानाचे राजकीय पडसाद उमटायला लागले आहेत. पिढ्यानं पिढ्या झालेल्या अत्याचारांबाबत जबाबदार समाजानं पापक्षालन करावं, या भागवतांच्या विधानाचा ब्राह्मण महासंघानं निषेध केला आहे. यासंदर्भात ब्राह्मण महासंघानं पुण्यातील संघाच्या कार्यालयात निवेदन दिलं आहे. (To do penance is like admitting a mistake says Anand Dave)

Mohan Bhagvat_Aanad Dave
Bharat Jodo : PFI, RSSवर राहुल गांधींनी केलं भाष्य; नव्या शिक्षण धोरणालाही विरोध

पापक्षालन करायचं म्हणजे ब्राह्मणांनी चूक केल्याचं मान्य केल्यासारखं आहे. काही व्यक्तींकडून नक्कीच चुका झाल्या असतील पण त्याच समाजातल्या काही नेत्यांनी, काही व्यक्तींनी त्याचा निषेध सुद्धा केलेला आहे. दुसरा समाज पुढे येण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहेत. याचा सुद्धा उल्लेख त्यांच्याकडून व्हायला हवा होता, असं ब्राम्हण महासंघाचे प्रमुख आनंद दवे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.

ब्राह्मण समाजाला वेगळं पाडायचा भागवतांचा पयत्न

मागच्या पाच-पन्नास वर्षांपूर्वी गुलामगिरी होती. लोकांना विकलं जात होतं पण त्यावर आता असं कोणी म्हणत नाही की, पापक्षालन करावं. मतदानाचा अधिकार नव्हता तेव्हा कोणी म्हणत नाही की त्याबद्दल पापक्षालन करावं. त्यामुळं पाच-सातशे हजार वर्ष आधीची एखादी घटना उकरुन काढून हिंदू समाजात मतभेद निर्माण करायचे, ब्राह्मण समाजात मतभेद निर्माण करायचे, ब्राह्मण समाजाला वेगळं पाडायचं हा उद्देश भागवतांकडून झालेला आहे, अशी आमची ब्राह्मण महासंघ आणि हिंदू महासंघ म्हणून ठाम भूमिका आहे, असंही दवेंनी स्पष्ट केलं.

भागवतांच्या विधानावर शंका

धर्मावर जेव्हा जेव्हा संकटं आली तेव्हा सर्वप्रथम ब्राह्मण समाजचं उभा राहिलेला आहे. मोहन भागवत आमच्यासाठी आदरणीय व्यक्तीमत्व आहेत. पण त्यांनी जर समाजाला काही संदेश दिला असेल तर तो खरा आहे का? याबद्दल आम्हाला शंका आहे. पण तरीही ब्राह्मण समाजानं पापक्षालन केलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे? हे त्यांनी आम्हाला सांगावं. त्यानंतर आम्ही यावर विचार करु. पण ही बातमी खोडसाळपद्धतीनं दिलेली चुकीचा मेसेज पसरवण्यासाठी दिलेली बातमी असावी. धर्मात ब्राह्मण समाजात वितुष्ट निर्माण व्हावं यासाठी ही बातमी दिलेली असावी, अशी शंकाही ब्राह्मण महासंघाच्या एका कार्यकर्त्यानं व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com