Pune Rains : पुणेकरांच्या डोक्याची आज मंडई होणार कारण...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 October 2019

 Pune Rains : पुणे : पुणेकरांनो, आज सायंकाळी लवकर निघाच. त्याला कारणही तसेच आहे. आज सायंकाळी पुण्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जरी पाऊस नाही आला तरी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महात्मा फुले मंडई सभा होणार आहे. त्यामुळे पाऊस पडो वा न पडो तुमची कोंडी होणारचं आहे.

आज सायंकाळी 6 वाजता मंडईत राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यांची सभा झाली तर गर्दी असणारचं. आणि गर्दी आहे म्हणजेच वाहतूक कोंडी होणारचं. तुम्ही आज मंडई, शिवाजीरस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्त्याने येणार असाल तर पर्यायी रस्त्यांचा वापर करा. 
 
दरम्यान, शहरात आज सोमवारी आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, हलक्‍या स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता असल्याचे हवामान खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. पावसामुळे गेल्या आठवड्यात त्यांची सभा स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेवर आजही पावसाचे सावट असणार आहे.

आज पाऊस झाला तर राज ठाकरेंची सभा रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण, पाऊस येणार म्हणजे गैरसोयही होणारचं. त्यामुळे आज छत्री, रेनकोट सोबत असु द्याच पण शक्यतो, आज वेळीच घरी पोहचा.

आज काहीही होऊ शकते. पाऊस आला तरी राज ठाकरे सभा घेऊ शकतात. कारण या आधी त्यांची सभा पावसामुळे रद्द झाली आहे. त्यामुळे कदाचित आणखी एक सभा ते रद्द करणार नाही. म्हणूनचं पुणेकरांनो, तुम्ही तयारीत रहा. आज पाऊस आला काय नाही आला काय? राज ठाकरेंची सभा झाली काय नाही झाली काय तरी तुम्ही अडकणारचं आहात.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Today Can Be Major Traffic Jam In Pune due to Raj thackeray Rally and Possibility of rainfall