सकाळ रिलीफ फंडा'तून उभारलेल्या माळीण वसतिगृहाचे आज उद्‌घाटन 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

मंचर : घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे जनता विद्या मंदिराच्या आवारात आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी "सकाळ रिलीफ फंडा'तून सव्वा कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या माळीण वसतिगृहाचे उद्‌घाटन रविवारी (ता. 18) सकाळी 11 वाजता होणार आहे. 
या वसतिगृहामध्ये इयत्ता पाचवी ते दहावी वर्गात शिक्षण घेत असलेल्या 100 गरीब व गरजू मुलांची निवासाची सोय होणार आहे. 

या वसतिगृह इमारतीचे उद्‌घाटन सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील; तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अजित काळे व जयसिंगराव काळे यांनी दिली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: today is Inauguration of the Malin hostel built from Sakal Relief Fund