esakal | पुण्यात आज लसीकरण बंद
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine

पुण्यात आज लसीकरण बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - महापालिकेतर्फे केले जाणारे लसीकरण आज (रविवारी) बंद असणार आहे, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. महापालिका प्रशासनाला शनिवारी ३४ हजार १०० डोस मिळाले आहेत, त्याद्वारे आज १९० केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. (Today Vaccination Close in Pune City)

महापालिकेकडे लस शिल्लक असली तरी प्रशासकीय सोईसाठी दर रविवारी लसीकरण केंद्रांना सुट्टी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

यापूर्वी शनिवारी ५० टक्के व रविवारी ५० टक्के लसीकरण केंद्र सुरू ठेवले जात होते, त्यामुळे लसीकरण केंद्रांवरील डॉक्टर व इतर कर्मचारी यांना एक दिवस सुट्टी मिळत होती व नागरिकांना आठवड्याचे सर्व दिवस लस उपलब्ध होत होती. पण हे नियोजन महापालिकेचे कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी गैरसोईचे ठरत असल्याने लस उपलब्ध असली तरी रविवारी लसीकरण बंद ठेवण्यात येणार आहे, असे अधिकार्यांनी सांगितले.

loading image