यवतला शाळेच्या इमारतीचे उद्‌घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यवतला शाळेच्या इमारतीचे उद्‌घाटन
यवतला शाळेच्या इमारतीचे उद्‌घाटन

यवतला शाळेच्या इमारतीचे उद्‌घाटन

sakal_logo
By

यवत, ता. ४ : येथे (ता. दौंड) सर्व शिक्षा अभियान योजनेतून २२ लाख रुपये खर्चून प्राथमिक शाळेच्या तीन वर्गखोल्यांची इमारत उभारण्यात आली आहे. तिचे उद्‌घाटन पंचायत समितीच्या सदस्या नीशा शेंडगे, माजी सदस्य कुंडलिक खुटवड व यवतचे सरपंच समीर दोरगे यांच्या हस्ते करण्यात आले.

यवतला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ व शाळा क्र.२ आणि विद्या विकास मंदिर हे माध्यमिक विद्यालय अशा तीन शाळा एकाच ठिकाणी आहेत. त्यांची एकूण विद्यार्थी संख्या सुमारे दोन हजार आहे. येथील ग्रामपंचायतच्या मालकीच्या इमारतीत माध्यमिक विद्यालयाचे काही वर्ग व शाळा क्र. २ चे काही वर्ग भरत असल्याने गोंधळ अनुभवास येत होता. नव्याने बांधलेल्या तीन वर्गखोल्यांमुळे शाळा क्र. २ चे पूर्ण वर्ग जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारतीमध्ये व माध्यमिक विद्यालयाचे पूर्ण व ग्रामपंचायत मालकीच्या इमारतीत भरविणे आता सोईचे झाले आहे.
नव्या इमारतीच्या समोरील भागात ग्रामपंचायतीतर्फे दहा लाख रुपये खर्चून पेव्हिंग ब्लॉक बसविले आहेत. त्याचेही उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी केंद्र प्रमुख प्रणयकुमार पवार, विद्या विकास मंदिरचे मुख्याध्यापक दादा मासाळ, शाळा क्र. एकचे मुख्याध्यापक रामभाऊ दोरगे, शाळा क्र. दोनच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुतवळ, नीलेश शेंडगे, बाळासाहेब टेकवडे उपस्थित होते. चांगदेव लवांडे यांनी सूत्रसंचालन केले. मल्लीनाथ शिंगे यांनी आभार मानले.
-----------------------------------
यवत (ता. दौंड) : उद्‌घाटन झालेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवी इमारत.
00097

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top