अखेर महावितरणकडून रोहित्राची दुरुस्ती

अखेर महावितरणकडून रोहित्राची दुरुस्ती

Published on

निरगुडसर, ता.१२ : येथील (ता. आंबेगाव) चोळीचा मळा येथील एका महिन्यापासून रोहित्र नादुरुस्त होते. यामुळे पिके जळू लागली होती. यामुळे शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर यांना ही समस्या सांगितली. त्यामुळे बांगर यांनी विजे अभावी पिकांना पाणी मिळत नसून शेतकऱ्यांना मोठा फटका बसेल. तसेच रोहित्राबाबत न बसविल्याबाबत जाब विचारला. तसेच कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला. यामुळे अधिकाऱ्यांनी रोहित्राची दुरुस्ती केली.

चोळीचा मळा येथील ज्या शेतकऱ्यांची पिके जळून गेली आहेत. ज्यांनी वीज बिल भरलेले असताना देखील महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वेळेवर ती रोहित्र बसवली नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारले तरी देखील काम झाले नाही. शेवटी शेतकऱ्यांनी बांगर यांच्याशी संपर्क साधला. बांगर यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीला तुम्हाला जबाबदार धरले जाईल अशी कडक भूमिका घेतली त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने रोहित्र बसविले. त्यामुळे भगवंत वळसे, संतोष मेंगडे, सुभाष वळसे, महादू वळसे, प्रकाश वळसे, मुकुंद वळसे संतोष मेंगडे, रंगनाथ वळसे, शांताराम वळसे, दिलीप वळसे, सचिन वळसे, दत्तात्रेय मेंगडे, अर्जुन मेंगडे या शेतकऱ्यांनी महावितरण व बांगर यांचे आभार मानले.

कायदेशीर कारवाईचा इशारा
महावितरणच्याअधिकाऱ्यांना वीज कायदा २००३ च्या तरतुदीनुसार ४८ तासात डीपी बसवली पाहिजे ही कायद्यात तरतूद असताना देखील एक महिना का लावला याचा जाब विचारला. शेतकऱ्यांच्या नुकसानीला महावितरणला जबाबदार धरून अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी भूमिका घेतल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने डीपी बसवून दिली, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी सांगितले.

00141

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com