Woman Raped
Woman RapedSakal

विवाहितेवर पाच जणांनी केला सामूहिक बलात्कार

खामगाव येथील राहणाऱ्या विवाहितेवर खोर (ता. दौंड) येथे पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला.
Summary

खामगाव येथील राहणाऱ्या विवाहितेवर खोर (ता. दौंड) येथे पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला.

यवत - खामगाव येथील राहणाऱ्या विवाहितेवर (Married women) खोर (ता. दौंड) येथे पाच जणांनी सामूहिक बलात्कार (Rape) केला. ही घटना शनिवारी (ता. २९) सायंकाळी साडे सहा ते रात्री आकराच्या दरम्यान घडली. याबाबत पीडितेने यवत पोलिस ठाण्यात तक्रार (Complaint) दिली आहे. यामुळे पोलिसांनी पाच व्यक्तीं विरुद्ध गुन्हा (Crime) दाखल केला आहे.

Woman Raped
पुण्यात माजी नगरसेवकाची ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त भांडगाव येथे हॉटेलात जेवण करण्यासाठी महिला पती सोबत आली होती. त्यावेळी हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या संबंधित महिलेस एका अनोळखी व्यक्ती तिला तिच्या भावाची ओळख सांगितली. ''तुमच्या भावाचा अपघात झाला असून, तुमच्या आईने त्यास दवाखान्यात नेले आहे'' असे सांगून आपल्या दुचाकीवर बसण्यास भाग पाडले. त्यानंतर महिलेस खोर गावच्या हद्दीतील इनामाचा डोंगर येथे जबरदस्तीने घेऊन गेला. तेथे गेल्यावर त्याने आपल्या इतर चार सहकाऱ्यांना बोलावून घेतले व तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. दरम्यान, आपली मानसिक स्थिती ठिक नसल्याने आपण दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. ३०) फिर्याद दिल्याचे महिलेने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com