महावितरण कार्यालयाला कंदील भेट-SUR21B0022

महावितरण कार्यालयाला कंदील भेट-SUR21B0022

शिरूर, ता. १७ : वीजबिल वसुलीसाठी केल्या जाणाऱ्या सक्तीचा निषेध नोंदविण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिरूर येथील ‘महावितरण’च्या कार्यालयासमोर निदर्शने केली. सावकारकी पद्धतीच्या या वीजबीलवसूलीचा निषेध म्हणून महावितरण कार्यालयाला कंदील भेट दिला.
मनसेचे तालुकाध्यक्ष तेजस यादव, शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनसे जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष सुशांत कुटे, रयत शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भरत काळे, हुडकोवासिय कृती समितीचे संघटक शैलेश जाधव, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष किरण दादा गव्हाणे, उपतालुकाध्यक्ष रवींद्र गुळादे, माजी शहराध्यक्ष संदीप कडेकर व रमणलाल भंडारी, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा डॉ. वैशाली साखरे, शहर सचिव विकास साबळे, शारदा भुजबळ, नितीन वायकर यांनी महावितरणच्या कार्यालयासमोर जुलमी वीजबिल वसुलीच्या निषेधार्थ घोषणा देत निदर्शने केली. दरम्यान, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सोमनाथ माने यांना मनसैनिकांकडून निवेदनाबरोबरच कंदील भेट देण्यात आला. वीजबिल वसुली थांबविण्याबाबत मनसेने दिलेल्या निवेदनाची माहिती वरिष्ठ कार्यालयाला कळविली जाईल, असे त्यांनी सांगितले.
महावितरणकडून ज्या पद्धतीने वीजबिल व वीजपंपबीलाची वसुली चालू आहे ती जुलमी सावकारकी पद्धत असल्याचा आरोप तेजस यादव यांनी केला. सक्तीच्या वसूलीतून महावितरण अन्याय करीत असून, त्यांचे मतपरिवर्तन व्हावे म्हणून संयम व सबुरीच्या भूमिकेतून विझलेला कंदील भेट दिला आहे. यातूनही सुधारणा न झाल्यास पेटता कंदीलही आम्ही देऊ शकतो. त्यातून आंदोलन आणखी पेटले तर त्याची जबाबदारी महावितरण वर असेल, असा इशारा अविनाश घोगरे यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com