मुळशीत शिष्यवृत्ती परीक्षेत स्वराली, स्वराज, सृष्टीची बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुळशीत शिष्यवृत्ती परीक्षेत स्वराली, स्वराज, सृष्टीची बाजी
मुळशीत शिष्यवृत्ती परीक्षेत स्वराली, स्वराज, सृष्टीची बाजी

मुळशीत शिष्यवृत्ती परीक्षेत स्वराली, स्वराज, सृष्टीची बाजी

sakal_logo
By

पिरंगुट, ता. १२ : मुळशी तालुक्यातून इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परिक्षेत स्वराली रोहिदास गोळे हिने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. स्वराज संतोष गावडे याने द्वितीय तर सृष्टी एकनाथ बडे हिने तृतीय क्रमांक मिळविला. हे तीनही विद्यार्थी पिरंगुट (ता.मुळशी) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहेत. स्वरालीने ९६ टक्के गुण मिळवून ती राज्य गुणवत्ता यादीत चौथी तर तालुका गुणवत्ता यादीत पहिली आली आहे. स्वराजने ९४.६६ टक्के गुण मिळविले असून तो राज्य गुणवत्ता यादीत सहावा तर तालुका गुणवत्ता यादीत दुसरा आला आहे. सृष्टीने ९२.६६ टक्के गुण मिळविले असून ती राज्य गुणवत्ता यादीत नववी तर तालुका गुणवत्ता यादीत तिसरी आली आहे. तालुका गट शिक्षणाधिकारी माणिक बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या २१४ असून त्यात पाचवीचे वर्ग असलेल्या शाळांची संख्या ३९ आहे. खासगी शाळांची संख्या ७ असून शिष्यवृत्तीसाठी तालुक्यातील एकूण ४६ शाळांतील १२०१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी १२५ विद्यार्थी पास झाले असून पंधरा विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरलेले आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top