भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालय ‘बँड प्रॉमिसींग’ यादीत

भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालय ‘बँड प्रॉमिसींग’ यादीत

पिरंगुट, ता. २१ : लवळे (ता. मुळशी) येथील भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा उच्च शिक्षण मंत्रालयाच्या एआरआईआईएच्या ‘बँड प्रॉमिसींग’ यादीत समावेश झाला आहे. भारत सरकारच्या अटल रँकींग ऑफ इंन्स्टीट्युशन ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंटस् तर्फे घेण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये पहिल्या अग्रमानांकित पन्नास इन्स्टीट्युटमध्ये या महाविद्यालयाचा समावेश केला आहे.
अटल रँकींग ऑफ इंन्स्टीट्युशन ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंटस् ही संस्था देशातील विविध तंत्रशिक्षण देणारी विद्यापीठे व अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या कामाचे परीक्षण करून त्यांनी केलेल्या उपक्रमानुसार मूल्यांकन करते. लवळे (ता. मुळशी) येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाने अवघ्या वर्षभरातच उद्योजकता व संशोधन क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांमध्ये चालना उत्पन्न करण्यासाठी अनेक दर्जेदार कार्यक्रमाचे सूत्रबद्ध व यशस्वी आयोजन केले होते. त्यामुळे येथील विद्यार्थी व प्राध्यापकांनी मिळून सुमारे ५७ पेटंटस फाईल केलेले आहेत व ६ स्टार्ट-अप्सची नोंदणी करण्यात आलेली आहे. भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम तसेच भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांच्या मार्गदर्शनामुळे व प्रोत्साहनामुळेच हे यश संपादन करण्यात आल्याचे प्राचार्य डॉ. आर .एन. पाटील यांनी सांगितले .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com