गाळ, मुरूम नेण्यास शेतकऱ्यांचा प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गाळ, मुरूम नेण्यास शेतकऱ्यांचा प्रतिसाद
गाळ, मुरूम नेण्यास शेतकऱ्यांचा प्रतिसाद

गाळ, मुरूम नेण्यास शेतकऱ्यांचा प्रतिसाद

sakal_logo
By

मोरगाव, ता. ३ : मोढवे (ता.बारामती) येथे मोरेवाडी-मोटेवाडी येथील ओढ्याच्या खोलीकरणाचे काम सकाळ रिलीफ फंड आणि शरयू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू आहे. या ओढ्यातून निघणारी गाळरूपी माती आणि मुरूम नेण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे.
घरासमोरील आणि वाड्यावस्त्यांना जोडणारे अंतर्गत रस्ते, गाईचा गोठा यामध्ये स्वखर्चाने मुरूम टाकण्यासाठी शेतकरी प्रतिसाद देत आहेत. तर ओढ्यातून निघणारी गाळरूपी माती पडीक जमिनीत टाकून ती लागवडीखाली आणण्यासाठी शेतकरी तयारी करीत आहेत. गावात जास्तीत जास्त जलसंधारणाची कामे करण्यासाठी येथील सरपंच शीतल मोरे आणि वैभव मोरे यांनी नियोजन केले आहे.
सकाळच्या माध्यमातून झालेल्या खोलीकरणाच्या कामातून या ओढ्यावर मोठ्या प्रमाणात निघालेला गाळ ओढ्याच्या भराव्यावर टाकून शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न केला आहे. वास्तविक, मुर्टी- मोढवे, उंबरवाडी, मोराळवाडी येथे खोलीकरणाच्या कामासाठी शेतकऱ्यांनी २०१४ पासून चांगला प्रतिसाद दिला. यामुळे या भागातील पाण्याच्या टंचाईचा प्रश्न मिटला असल्याची माहिती सरपंच मोरे, मुर्टीचे उपसरपंच किरण जगदाळे व मोराळवाडीचे उपसरपंच नीलेश मासाळ यांनी दिली. ज्या शेतकऱ्यांना शेतात माती टाकायची असेल त्यांनी ओढा खोलीकरणाच्या कामातून निघालेली माती विना रॉयल्टी स्वखर्चाने नेऊन टाकावी, असे आवाहन मोरगावचे मंडल अधिकारी नीलकंठ मुळे यांनी केले आहे.

00607

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top