
जोगवडी येथील नळपाणीपुरवठा योजना बंद
मोरगाव, ता.२१ : जोगवडी (ता. बारामती) येथील गावच्या पाणीपुरवठा विहिरीची पाण्याची पातळी पूर्णपणे खालावली असून त्यामुळे पंधरा दिवसापासून नळपाणीपुरवठा योजना बंद आहे. पाण्याच्या शाश्वत उदभवाअभावी सध्या जोगवडीकरांची पाण्यासाठी वणवण सुरु आहे. टंचाईची परिस्थिती पाहून प्रशासनाने टॅंकर सुरु करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
टंचाईच्या तीव्र झळा बसत असल्यामुळे येथील सरपंच प्रभू महानवर यांनी टॅंकर लवकर सुरु करावा, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बारामती पंचायत समितीकडे लेखी निवेदन दिले आहे. मात्र सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. जोगवडी गावठाण व वाड्यावस्त्यांवर सुमारे वीसपेक्षा जास्त पाण्याचे हातपंप आहेत मात्र हातपंपाची पाण्याची पातळी खालावली असल्यामुळे हातपंपांनाही पाणी येत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे पंधरा दिवसांपासून जोगवडीकरांना मिळेल तेथून पाणी आणण्यासाठी वणवण करावी लागत आहे. किमान पावसाळ्यापर्यंत आणि पाणीपुरवठा विहिरीत पुरेसे पाणी येईपर्यंत पंचायत समितीने येथे टॅंकरची व्यवस्था करावी अशी मागणी, ग्रामपंचायतीने केली आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..