नीरेत स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नीरेत स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात
नीरेत स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात

नीरेत स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात

sakal_logo
By

गुळुंचे, ता. ७ : नीरा (ता. पुरंदर) येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली. या वेळी सुमारे ५०० भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. येथील प्रभाग क्रमांक चार येथे मोरे निवास या ठिकाणी असलेल्या स्वामी समर्थ मंदिरात सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. सकाळी ८ वाजता अभिषेक, सकाळी ९ वाजता होमहवन, दुपारी ३ वाजता भजन असे विविध धार्मिक कार्यक्रम झाले. या वेळी श्री साईनाथ भजनी मंडळ व स्वामी समर्थ मंडळ, नीरा यांचा भजनाचा कार्यक्रम झाला.

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..