मल्ल जगताप व शेख यांच्यात चुरशीची लढत

मल्ल जगताप व शेख यांच्यात चुरशीची लढत

कळस, ता. १८ ः पळसदेव (ता. इंदापूर) येथील ग्रामदैवत पळसनाथ यात्रेनिमित्त कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पहिलवान गणेश जगताप विरुद्ध पहिलवान सिकंदर शेख या राष्ट्रीय कुस्ती विजेत्या मल्लांमध्ये चुरशीची लढत झाली. या लढतीत सिकंदर शेख याने गणेश जगतापला एकच्याक डावावर अस्मान दाखवत पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.
यात्रेनिमित्त भरविलेल्या या आखाड्यासाठी नामवंत मल्लांनी हजेरी लावली. तर मोठ्या संख्येने उपस्थित राहत कुस्ती शौकिनांनी कुस्त्यांचा आनंद लुटला.
ग्रामदैवत पळसनाथ मंदिरात पहाटे देवाची महापूजा, आरती करण्यात आली. सायंकाळी देवाच्या छबिन्याचे व कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्त्यांच्या मैदानात लहान- मोठ्या सुमारे दिडशे कुस्त्या पार पडल्या. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, जीवन गौरव पुरस्कार विजेते पंढरीनाथ पठारे, जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, रावसाहेब मगर, उत्तमराव फडतरे, महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर, मारुती मारकड आदींनी कुस्ती आखाड्यात हजेरी लावली. नेमलेल्या प्रमुख सहा कुस्त्यांनी कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
या आखाड्यात झालेल्या कुस्त्यांमध्ये द्वितीय क्रमांकासाठी महेंद्र गायकवाड विरुद्ध महारुद्र काळेल यांच्यात लढत झाली. यामध्ये काळेल याने घुटना डावावर गायकवाडला चितपट केले. राजपाल सोनटक्के विरुद्ध प्रशांत जगताप यांच्यात झालेल्या लढतीत राजपालने तिसऱ्या क्रमांकाचे बक्षिस मिळविले. जोतिबा अटकळे विरुद्ध अमित सूळ यांच्यात झालेल्या लढतीत जोतिबा अटकळे विजयी झाला. तर तेजस काळे विरुद्ध सूरज गुळवे यांच्यात झालेल्या लढतीत काळे याने गुळवे याला चितपट करून गावातील मैदानात आनंदोत्सव साजरा केला. पप्पू देशमुख विरुद्ध विजय पाटील यांच्या लढतीत विजय देशमुख विजयी झाला.

येथील आखाडा राज्यातील शिस्तबद्ध आखाड्यांच्या यादीत गणला जातो. यामुळे राज्यातील अनेक नामवंत मल्लांबरोबर कुस्ती शौकिनांची येथे आवर्जून हजेरी असते. कोरोनामुळे दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर यंदा भरविण्यात आलेल्या आखाड्यातील कुस्त्यांचा आनंद घेण्यासाठी सुमारे दहा हजार कुस्ती शौकिनांनी उपस्थिती लावली होती. कुस्ती आखाड्यानंतर सायंकाळी मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. रविवारी (ता. १७) यात्रेच्या दुसऱ्या दिवशी यात्रा बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांनी खरेदीचा आनंद लुटला. यात्रा समितीच्यावतीने यात्रेचे नियोजन करण्यात आले होते.
1070

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com