नायगावात होतकरू विद्यार्थ्यांना मदत

नायगावात होतकरू विद्यार्थ्यांना मदत

माळशिरस, ता. ४ : नायगाव (ता.पुरंदर) येथील माजी उपसरपंच किशोर खळदकर यांनी स्वतःच्या वाढदिवसावरील अनावश्‍यक खर्च टाळून सिद्धेश्वर विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना मदत केली.
विद्यालयातील पाचवीच्या वर्गातील वेदांत बोरावके व नववीची समीक्षा बोरावके या विद्यार्थ्यांचे वडील प्रमोद बोरावके यांचे नुकतेच निधन झाले. यामुळे या मुलांना शैक्षणिक मदत म्हणून त्यांच्या शालेय गणवेशाची रक्कम रोख स्वरूपात शाळेत जमा केली.
याप्रसंगी नायगाव सरपंच बाळासाहेब कड, देवस्थान ट्रस्टचे सचिव राहुल कड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोविंद खेसे, माजी उपसरपंच आणि चंद्रकांत चौंडकर, मंगेश चौंडकर हे उपस्थित होते.
दत्तात्रेय रोकडे यांनी सूत्रसंचलन तर बबन खेडकर यांनी आभार मानले.

00748

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com