राजुरी येथील रस्ता डांबरीकरणाच्या कामाचे उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजुरी येथील रस्ता डांबरीकरणाच्या कामाचे उद्‍घाटन
बिबट्याचा कुत्र्यावर न्हावरे येथे हल्ला

राजुरी येथील रस्ता डांबरीकरणाच्या कामाचे उद्‍घाटन

sakal_logo
By

राजुरी येथील रस्ता डांबरीकरणाच्या कामाचे उद्‍घाटन आळेफाटा, ता. २२ : राजुरी (ता. जुन्नर) येथील आबाटेक वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे उद्‍घाटन जिल्हा परीषदेचे सदस्य पांडुरंग पवार यांच्या हस्ते करण्यात आले. राजुरी ते आबाटेक हे अंतर तीन किलोमीटर आहे. यापैकी दोन किलोमीटरचे काम माजी आमदार शरद सोनवणे यांनी एक कोटीचा निधी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून दिला होता व उर्वरित राहिलेल्या एक किलोमीटरचे काम करण्याचे राहीले होते. पवार यांच्या कडे हे काम पूर्ण करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार पवार यांनी या कामासाठी २० लाख रुपयांचा निधी दिला आहे. यावेळी उंचखडक गावच्या सरपंच सुवर्णा कणसे, उपसरपंच अजय कणसे, बाळासाहेब हाडवळे, दत्ता कणसे, सुरेखा कणसे, विजया कणसे, मनीषा कणसे, रामदास यादव, एकनाथ कणसे, सीताराम कणसे, सुनील कणसे, पंकज कणसे, राजेश कणसे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top