आळेफाटा उपबाजारात ३१,२७२ कांदा पिशव्यांची आवक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळेफाटा उपबाजारात ३१,२७२ कांदा पिशव्यांची आवक
न्हावरे येथील दोन विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती

आळेफाटा उपबाजारात ३१,२७२ कांदा पिशव्यांची आवक

sakal_logo
By

आळेफाटा, ता. २४ : आळेफाटा येथील उपबाजारात रविवारी (ता. २३) कांद्याची विक्रमी आवक होऊन ३१,२७२ कांदा पिशवीची उच्चांकी आवक झाली असून एक नंबर कांद्यास दहा किलोला ३०१ रुपये बाजारभाव मिळाला
असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, उपसभापती दिलीप डुंबरे व सचिव रूपेश कवडे व शैलेश नायकवडी यांनी दिली दिली.
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा या ठिकाणी रविवारी मोढयांत चालू हंगामातील नवीन कांद्याची विक्रमी आवक झाली असून येथील उपबाजारात ३१,२७२ कांदा पिशव्यांची आवक होऊन मार्केटमध्ये एक नंबर गोळा कांद्यास दहा किलोस २७० ते ३०१ रूपये बाजार भाव मिळाला होता. तसेच दोन नंबर कांद्यास १९० ते २७० रुपये बाजारभाव मिळाला. तर तीन नंबर कांद्यास दहा किलोस १३० ते १९० रुपये बाजारभाव मिळाला. गोल्टा कांद्यास दहा किलोस ५० ते १०५ रुपये बाजार भाव मिळाला व बदला कांद्यास दहा किलोस १० ते ५० रुपये बाजारभाव मिळाला आहे.
दरम्यान आळेफाटा येथील उपबाजारात हंगामातील नवीन कांद्याची आवक झाली असून बाजारभाव दहा किलोला पाच ते दहा रुपयांनी कमी झाला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top