कठोर परिश्रमाची तयारी असेल तर यश मिळतेच ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कठोर परिश्रमाची तयारी असेल तर यश मिळतेच !
कठोर परिश्रमाची तयारी असेल तर यश मिळतेच !

कठोर परिश्रमाची तयारी असेल तर यश मिळतेच !

sakal_logo
By

सुपे, ता. १ ः शारिरीक तंदुरुस्ती, जिद्द, आत्मविश्वास, अभ्यास, चांगले छंद आणि कठोर परिश्रमाची तयारी असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळतेच, असा अनुभव लेफ्टनंट श्रीयश देविदास ढमे यांनी सांगितला.
मूळचे नारोळी (ता. बारामती) येथील असलेले लेफ्टनंट ढमे सध्या चिंचवड येथे राहत आहेत. भारतीय सेनेत जम्मू येथे लेफ्टनंट पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गावकऱ्यांनी नुकताच त्यांचा सत्कार केला. दरम्यान, यावेळी ढमे यांनीही माहिती दिली.
शेतकरी कुटुंबातील ढमे यांची आर्थिक स्थिती बेताची होती. आता वडिलांचा बांधकाम व्यवसाय आहे. ढमे म्हणाले, ‘‘शालेय शिक्षण चिंचवडला इंग्रजी माध्यमातून झाले. पुढे औरंगाबाद येथील एसपीआय (सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट) येथे अकरावी, बारावी करताना माझ्या जीवनातील महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला. येथेच लोकसेवा आयोगाच्या परिक्षेविषयी मार्गदर्शन लाभल्याने तयारी झाली. दरम्यान, राज्यस्तरीय फुटबॉल, जिल्हास्तरीय टेबल टेनिस खेळलो. क्रिकेटचा सराव ठेवला. त्यानंतर पुण्याच्या जेएसपीएममध्ये स्थापत्य शास्त्रात पदवीधर झालो. दरम्यान, लोकसेवा आयोगाच्या परिक्षा देत असल्याने सन २०२० मध्ये माझी भारतीय हवाई दलात निवड झाली. त्याच वेळी भारतीय सेनेत व नौदलातही निव़ड झाली. त्या वेळी डेहराडून येथील आयएमए (इंडियन मिलिटरी अॅकॅडमी) मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. १३ एप्रिल २०२१ ला प्रशिक्षण झाले. नंतर ११ डिसेंबर २०२१ ला लेफ्टनंट टेक्निकल ऑफिसर म्हणून रुजू झालो. वडील देविदास व आई सविता यांचे मी भारतीय लष्करात अधिकारी होण्याचे स्वप्न होते. तसेच देशसेवा करण्याची माझीही इच्छा होती. हे स्वप्न अखेर साकार झाले.’’

स्वतःवर विश्वास ठेवा...
मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेले अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मला मार्गदर्शन झाले. परीक्षा अवघड असते पण, एकदा का त्यात घुसलो तर स्वतःवर विश्वास ठेवा, अभ्यास करा यश नक्की मिळतेच. आधीपासून हुशार नसला तरी घाबरू नका. दहावीनंतर सर्वांगीण अभ्यासाचे कष्ट घेणे गरजेचे आहे. त्याच बरोबर काही चांगले छंद जोपासणे, नियमीत व्यायाम शारिरीक तंदुरुस्तीसाठी महत्त्वाचे आहे. असे असेल तर यश दूर नाही, असे लेफ्टनंट ढमे यांनी सांगितले.


लेफ्टनंट श्रीयश ढमे

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top