ढगाळ हवामानामुळे पिकांना धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ढगाळ हवामानामुळे पिकांना धोका
ढगाळ हवामानामुळे पिकांना धोका

ढगाळ हवामानामुळे पिकांना धोका

sakal_logo
By

भुकूम, ता. १५ ः मुळशी तालुक्यात ढगाळ हवामानामुळे पिके, फळबागा, भाजीपाल्यावर रोग पसरत असून उत्पन्नावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. करपा, बुरशी, तुडतुडे, मावा रोग पिकांवर होत आहे.
तालुक्यात यावर्षी आॅक्टोबर महिन्यापासून ऊन, थंडी पडली नाही. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. तसेच रविवारी मध्यम पाऊस झाला. कायम ढगाळ हवामान आहे. कधी ऊन तर कधी पाऊस पडतो. कधी सकाळी दाट धुके व थंडी पडते. अशा हवामानामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. शेतकऱ्यांनी हरभरा, मसूर, गहू, भुईमूग, पावटा, वाटाणा यांची पेरणी तसेच कांदा व भाजीपाल्याची लागवड केली. पेरणी केलेल्या पिकांची हवामानामुळे उगवण झाली नाही तर उगवलेल्यांची रोगामुळे मर मोठ्या प्रमाणावर झाली. शेतकऱ्यांनी औषधे, किटक नाशके फवारणी अनेकवेळा करावी लागली. त्यामुळे भांडवली खर्चात वाढ झाली. तसेच आंब्याचा मोहोर फुटून फळधारणा बहरत असते. दरम्यान, ढगाळ हवामानामुळे पहिल्या टप्प्यात फुटलेला मोहोर गळून जात आहे. दुसऱ्या टप्प्यातील मोहोर फुटण्याचा कालावधी सुरू झाला आहे. हवामानामुळे तो फुटत नाही. त्यामुळे यावर्षी तरी आंब्याच्या उत्पन्नाबाबत शेतकरी धास्तावले आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top