घोटावडे शाळेस १२ लॅपटॉप भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घोटावडे शाळेस १२ लॅपटॉप भेट
बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक

घोटावडे शाळेस १२ लॅपटॉप भेट

sakal_logo
By

भुकूम, ता. १४ : घोटावडे (ता. मुळशी) येथील प्राथमिक शाळेस ईसीये कंपनीच्यावतीने बारा लॅपटॉप भेट देण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीस कचरा निर्मुलनासाठी लुप्त व रॅड कंपनीच्यावतीने घंटागाडी गाडी लोकार्पण करण्यात आली. गावाला बारा वाड्या असून एकच घंटागाडी गाडी आहे. त्यामुळे कंपन्यांकडे कचरा निर्मूलनासाठी एक गाडी मागितली होती, असे सरपंच भाग्यश्री देवकर व उपसरपंच राजाभाऊ शेळके यांनी सांगितले. तसेच आधुनिक शिक्षणासाठी लॅपटॉपची गरज होती. ईसीये कंपनीचे अधिकारी सिकंदर घोडके यांनी मागणी पूर्ण केली होती. यावेळी कंपनीचे अधिकारी प्रमोद कुलकर्णी, वैद्य, व्यंकटेश शेटे, संदीप झणझणे, प्रकाश भेगडे, गंगाराम मातेरे, आनंद घोगरे, चंद्रकांत देवतांचे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top