उपमुख्यमंत्र्यांबाबतचा इशारा मागे : सोनवणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपमुख्यमंत्र्यांबाबतचा 
इशारा मागे : सोनवणे
जुन्नर तालुक्यात मल्चिंगचा कांदा लागवडीमध्ये वापर-APT21B0078

उपमुख्यमंत्र्यांबाबतचा इशारा मागे : सोनवणे

sakal_logo
By

पिंपळवंडी, ता. २१ : शिवाजी महाराजांचा जन्म ज्या जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला, तिथे सर्वात प्रथम शिवसृष्टी व्हायला हवी होती, ती अजित पवार यांनी बारामती येथे सुरु केली. जुन्नरमध्येच सर्वात प्रथम बिबट सफारी होणार असतानाही ती पवार यांनी बारामतीला नेली. या निर्णयामुळेच त्यांना जुन्नरमध्ये पाय ठेऊ देणार नाही, हा मी दिलेला इशारा आपल्या राजांच्या पुतळ्याचे उद्घाटन दिमाखदार व्हावे व या कार्यक्रमाला गालबोट लागू नये म्हणून मी मागे घेत असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व माजी आमदार शरद सोनवणे यांनी चाळकवाडी (ता. जुन्नर) येथे पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, ‘‘मुंबई येथे शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली असून, मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, ‘जुन्नरची शिवसृष्टी व बिबट सफारी प्रकल्पासाठी तुमच्या पाठीशी उभा राहील.’ अश्वारूढ पुतळ्याच्या सर्व खर्चाचा भार हा जुन्नर नगरपालिकेने उचलला असून, शिवसेनेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्‍याम पांडे व सर्व नगरसेवकांचे कौतुक करतो. तसेच, नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी परवानग्या दिल्या. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. या पुतळ्याच्या उद्‍घाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाइन उपस्थित असणार असून, अजित पवार व अनेक नेते मंडळी हे उद्घाटक म्हणून असणार आहेत. शिवराय माझे दैवत असून, या कार्यक्रमाचे स्वागत करतो.’’