बिरसा ब्रिगेडच्या ११ कार्यकर्त्यांवर गुन्हा

बिरसा ब्रिगेडच्या ११ कार्यकर्त्यांवर गुन्हा

घोडेगाव ता १५ ः आंदोलन करून समाजामध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी बिरसा ब्रिगेड संघटनेच्या ११ जणांविरुद्ध घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद स्वप्नील मारुती वाघमारे (सध्या रा. चिंचवड पुणे) यांनी दिली आहे.

याप्रकरणी राहुल विठ्ठल कवठे (रा जांभुळशी, ता. जुन्नर), शुभम चंद्रकांत उंडे (रा. राळेगण, ता. जुन्नर), संजय भाऊ भांगे (रा. तांबे, ता. जुन्नर), तुषार यमना वालकोळी (रा. तांबे, ता. जुन्नर), मारुती कांताराम चिमटे (रा. कुसवली, ता.मावळ), विशाल झडे (रा. वडेश्वर, ता. मावळ), नाथा तळपे (रा. मंदोशी, ता. खेड), सोमनाथ तुकाराम मोरमारे (रा. माऊ, ता.मावळ), प्रवीण पारधी (रा. राजपूर, ता आंबेगाव), प्रदिप पारधी (रा. जांभोरी, ता आंबेगाव), उमाबाई मते (रा. कोटमदरा, ता. आंबेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोडेगाव येथील ओम साई मंगल कार्यालयात हा प्रकार घडल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com