घोडेगाव येथे सोमवारी तक्रार निवारण दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घोडेगाव येथे सोमवारी तक्रार निवारण दिन
पाटसकर कुटुंबीयांना द्यावयाच्या जागेसाठी ‘नगरविकास’ची तत्परता

घोडेगाव येथे सोमवारी तक्रार निवारण दिन

sakal_logo
By

घोडेगाव, ता. २२ ः घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील पंचायत समिती नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात सोमवारी (ता. २५) नागरिकांसाठी तालुकास्तरीय समस्या निवारण दिनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली.
आंबेगाव तालुका अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायतींबाबत नागरिकांच्या काही समस्या, अडीअडचणी व काही तक्रारी असल्यास किंवा पंचायत समिती आंबेगाव संदर्भात तक्रारी असल्यास नागरिकांनी २५ रोजी सकाळी ११ ते २ दरम्यान आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात व संबंधित कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले. ज्या समस्यांचा यापूर्वीच निर्णय झालेला आहे, न्यायालयीन प्रकरणे, राजस्व, अपिल, सार्वजनिक स्वरूपाच्या तक्रारी, सेवाविषयक, आस्थापना आदी बाबतच्या सुनावणी तक्रार निवारण दिन कार्यक्रमांत घेण्यात येणार नसल्याचे पठारे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top