महावीरांवरील पाळण्याचे केडगावात गायन

महावीरांवरील पाळण्याचे केडगावात गायन

Published on

केडगाव, ता. १४ ः केडगाव (ता. दौंड) येथे महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जैन श्रावक संघाने जयंतीचे आयोजन केले होते. सकाळी बाजारपेठेतून महावीरांच्या प्रतिमेची शोभा यात्रा काढण्यात आली. मिरवणूक जैन स्थानकात पोहचल्यानंतर मंगलचरणाने सर्वांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जैन साध्वी उज्वलाकुंवरजी, किर्तीसुधाजी, उन्नतीश्रीजी या उपस्थित होत्या. उज्वलाकुंवरजी यांनी भगवान महावीर यांच्या जीवनातील विविध घटना व अहिंसा यावर माहिती दिली. किर्तीसुधाजी यांनी भगवान महावीर यांच्या पाळणा म्हटला. उन्नतीश्रीजी यांनी स्तवन केले. महिला मंडळाच्या अध्यक्षा नयना पोखरणा यांनी मनोगत व्यक्त केले. पूजा फिरोदिया यांनी स्वागत गीत गायले. शीतल पितळीया व प्रतिभा छाजेड यांनी चालविलेल्या जैन पाठशाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी बक्षीसे देण्यात आली. मंगलपाठाने कार्यक्रमाची सांगता झाली.

KED22B01689

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com