एक कुशल नेतृत्व... आमदार संजय जगताप

एक कुशल नेतृत्व... आमदार संजय जगताप

एक कुशल नेतृत्व...
आमदार संजय जगताप

आपल्या वडिलांप्रमाणेच पुरंदरच्या विकासासाठी अहोरात्र झटणारे आमदार संजय जगताप यांनी पुरंदर-हवेली मधील तरुणांचे भविष्य उज्ज्वल करण्याचा ध्यास घेतला. त्यासाठी त्यांनी तरुणांना केवळ नोकरीसाठीच नव्हे तर व्यवसायासाठीही दिशा दाखवली. याबरोबरच शेतकऱ्यांनी नुसते शेतीवर अवलंबून न राहता जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करावा यासाठी पुरंदर मिल्कच्या माध्यमातून धवल क्रांती निर्माण केली. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले हे व्यक्तिमत्त्व पुरंदरच्या जनतेच्या मनानमनात वसले आहे.


पुरंदर ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, छत्रपती संभाजी महाराज यांची जन्मभूमी, या पुण्यभूमीत अनेक रत्नांनी जन्म घेतला. आपल्या कर्तृत्वाने असामान्य प्रतिभेने अनेकांनी पुरंदरच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी तसेच पुरंदरच्या जनतेच्या हृदयावर कोरून ठेवले आहे. त्यापैकी एक नाव म्हणजे स्वर्गीय नामदार चंदुकाका जगताप होय. आपल्या कुशाग्र बुद्धीने शिक्षण, सहकार, राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवून पुरंदरच्या जनतेच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणारे व्यक्तिमत्त्व. स्वर्गीय काकांच्या बरोबरीने लोकांच्या सुखदुःखात सामील होणाऱ्या सासवड नगरपालिकेच्या माजी अध्यक्षा आनंदी काकी जगताप यांच्या उदरी जन्म घेतलेले, पुरंदर-हवेलीचे कर्तव्यदक्ष आमदार संजयजी जगताप होय.
आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले हे व्यक्तिमत्त्व, वडिलांप्रमाणेच पुरंदरच्या विकासासाठी अहोरात्र झटताना दिसत आहे. ‘कोणतेही काम चांगल्या पद्धतीने सुरू केले असता ते अर्धे पूर्ण झाल्यासारखेच असते.’ या उक्तीप्रमाणे आमदार संजय जगताप यांनी पुरंदर नागरी पतसंस्था, सोपानकाका सहकारी बँक, इंदिरा महिला पतसंस्था, उभारून पुरंदर-हवेली मधील तरुणांना नुसती नोकरीच उपलब्ध केली नाही, तर अनेकांना व्यवसायामध्ये उभे केले. शेतकऱ्यांनी नुसते शेतीवर अवलंबून न राहता जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करावा यासाठी पुरंदर मिल्कच्या माध्यमातून पुरंदरमध्ये धवल क्रांती निर्माण केली. तळागाळातील मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी स्वर्गीय काकांनी कष्टामधून उभी केलेली, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या सचिव पदाची धुरा सांभाळत शिक्षण क्षेत्रात नवनवीन उपक्रम निर्माण करून, पुरंदर मधील विद्यार्थी हा स्पर्धेच्या युगात कोठे कमी पडणार नाही. याची काळजी घेताना आमदार संजय जगताप हे नेहमीच दिसतात. सहकार क्षेत्रात अतिशय अभ्यास असल्यामुळे पुणे जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर त्यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली अशा अनेक जबाबदाऱ्या लीलया पेलत असताना आज जगावर जे कोरोना महामारीचे संकट आले आहे त्या संकटाचा सामना करत असताना त्यांच्या सौभाग्यवती राजवर्धिनीताई जगताप यांनी त्यांच्या ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून खळद येथे अत्याधुनिक कोविड सेंटर उभारून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे मोठे काम केले. आपण लोकांच्या सोबत आहोत ही भावना जनतेच्या मनामध्ये निर्माण करून दिली. पुरंदर तालुक्यातील बहिरवाडी सारख्या गावात शंभर टक्के लसीकरण करून संपूर्ण देशामध्ये या गावाला शंभर टक्के लसीकरणाचा पूर्ण करण्याचा मान मिळवून दिला.
पुरंदर-हवेलीचा विकासाचा दर वाढत आहे. गाव शिवारातील पाणंद रस्ते, अंतर्गत रस्ते, सोलर लाइट, महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीसारख्या नगरीला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणे असेल, किंवा पुढील पन्नास वर्षांनंतर पुरंदरमध्ये कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, याचे अतिशय योग्य नियोजन आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सतत धावपळ करणारे अभ्यासू नेतृत्व असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे संजय जगताप. याचे उदाहरण पाहिजे असेल तर सासवड व जेजुरी नगरपालिकेला स्वच्छतेच्या बाबतीत नामांकन मिळून देशांमध्ये या शहरांचा नावलौकिक झाला तो आमदार संजयजी जगताप यांच्या मार्गदर्शनामुळेच असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. पुरंदर-हवेली मधील आबालवृद्धांना बारा ज्योतिर्लिंग यात्रा, हज यात्रा केली. आणि लोकांनी त्यांना श्रावणबाळ उपाधी बहाल केली. अशा या कर्तव्यतत्पर व दूरदृष्टी असलेल्या व्यक्तिमत्त्वात निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

शब्दांकन : गणेश खळदकर, माजी उपसरपंच, खळद.
संकलन : योगेश कामथे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com