मोबाईल विक्रेत्याचे ४६ हजार लांबविले

मोबाईल विक्रेत्याचे ४६ हजार लांबविले

राजगुरुनगर, ता. ४ : इंग्रजी बोलून परदेशी असल्याचे भासवून बंधे पैसे मागण्याच्या बहाण्याने दोन भामट्यांनी मोबाईल विक्री करणाऱ्या दुकानदाराचे ४६ हजार लांबविल्याची घटना रविवारी (ता२.) रात्री घडली. याप्रकरणी तुषार चंद्रकांत घुमटकर (रा. समतानगर, माळीमळा, राजगुरुनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पुणे-नाशिक महामार्गालगतच्या धनश्री चौकात त्यांचे महालक्ष्मी मोबाईल शॉपी नावाने दुकान आहे. दुकानात दोघेजण इंग्रजी संभाषण करीत आले. त्यांनी कार्ड रीडर खरेदी केला आणि तीस रुपये रोख दिले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या जवळच्या शंभर व दोनशे रुपयांच्या नोटा घुमटकर यांना दाखविल्या व इंग्रजीत बोलत दोन हजार रुपये बंधे मागितले. दोन हजारांची नोट नसल्याचे दाखविण्यासाठी घुमटकर यांनी विश्वासाने पाचशे रुपयांच्या नोटा असलेले पाकीट त्यांच्याकडे बघायला दिले. त्यावेळी त्यांनी दोन हजारांची नोट पाहण्याचा बहाणा करीत पाचशेच्या नोटा खालीवर करून पाहिल्या. त्याचवेळी नजरभूल करून हातचलाखीने पाकिटातील पाचशे रुपायांच्या ९२ नोटा लांबवून पोबारा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com