भैरवनाथ पतसंस्थेचे ठेवीदार आक्रमक

भैरवनाथ पतसंस्थेचे ठेवीदार आक्रमक

राजगुरुनगर, ता. ४ : वाकी बुद्रुक (ता. खेड) येथील भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळत नसल्याने त्यांनी खेडचे सहायक निबंधक हर्षित कांबळे यांना घेराव घालून, पतसंस्थेचे लेखापरीक्षण करून व संचालक मंडळाच्या कारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. कांबळे यांनी त्यांच्या मागणीची दखल घेत तातडीने लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले. या पतसंस्थेत वाकी परिसरातील शेतकरी, शेतमजूर, ज्येष्ठ नागरिक व पेन्शनधारक यांनी ठेवी ठेवल्या आहेत. अनेक वर्षांपासून ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदार हवालदिल झाले आहेत. या संस्थेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याने पतसंस्थेचा कारभार ठप्प आहे. पतसंस्थेने कार्यालय बंद केले आहे. या संस्थेचे लेखापरीक्षण करून गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ठेवीदारांनी अनेकदा खेड सहायक निबंधक कार्यालयाकडे केली होती. तसेच जून महिन्यात ठिय्या आंदोलनही केले. त्यानंतर या संस्थेवर लेखा परिक्षक नेमण्यात आला. मात्र, लेखा परीक्षक गेल्या दीड महिन्यांपासून लेखा परिक्षण करण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे ते आज आक्रमक पवित्र्यात सहायक निबंधक कार्यालयात आले होते.
गैरव्यवहार करणाऱ्यांकडून ठेवींच्या पैशांची वसुली करून ठेवीदारांना द्यावी, अन्यथा ठेवीदार आमरण उपोषणाला बसतील, असा इशारा ठेवीदारांनी यावेळी दिला.

भैरवनाथ पतसंस्थेचे दफ्तर ताब्यात घेऊन लेखापरीक्षण दोन दिवसांत सुरू करण्यात येईल. ते पूर्ण होऊन गैरव्यवहार स्पष्ट झाल्यानंतर, तो करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, तसेच त्यांच्याकडून रक्कमही वसूल करण्यात येईल.
-हर्षित कांबळे, सहायक निबंधक, खेड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com