पंचाहत्तरी पार केलेल्यांचा अनुभव होणार शब्दबध्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंचाहत्तरी पार केलेल्यांचा अनुभव होणार शब्दबध्द
पंचाहत्तरी पार केलेल्यांचा अनुभव होणार शब्दबध्द

पंचाहत्तरी पार केलेल्यांचा अनुभव होणार शब्दबध्द

sakal_logo
By

राजगुरूनगर, ता. १२ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवावर आधारित लेखन स्पर्धा खेड तालुका विद्या विकास प्रतिष्ठानने आयोजित केल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी दिली.
खेड तालुक्यातील कोणत्याही गावातील ७५ वर्षांपुढील नागरिकांशी संवाद साधून त्यांचे अनुभव त्यांच्याच भाषेत शब्दबद्ध करून कोणत्याही वयोगटातील व्यक्ती स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेसाठी, इंग्रजकालीन राजवट, शासन व्यवस्था, गाव कारभार, करपद्धती, न्यायनिवाडा, शेती पीक पद्धती, पाणी, शिक्षण आणि आरोग्य सुविधा, चलन व्यवहार पद्धती, सण उत्सव, दुष्काळ पूर, बारा बलुतेदार पद्धती असे नऊ विषय ठेवले आहेत. या अनुभव लेखनाबरोबर संबंधित नागरिकांचे जुने छायाचित्र जोडण्याचेही आवाहन संयोजकांनी केले आहे.
स्पर्धेसाठी स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख बक्षिसे ठेवली आहेत. पहिल्या तीन क्रमांकासाठी अनुक्रमे ११ हजार रुपये, ७ हजार रुपये, ५ हजार रुपये; तर उत्तेजनार्थसाठी १ हजार रुपयांची ५ बक्षिसे ठेवली आहेत. १ फेब्रुवारी २पर्यंत हे अनुभव लेखन हस्तलिखित किंवा टाईप करून पीडीएफ फाईलद्वारे ९७६७२ २२२९९ या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे पाठवावे, असे आवाहन केले आहे. या लेखांची नंतर पुस्तिका संपादित करण्याचा संयोजकांचा मनोदय आहे.

पारतंत्र्यातील इंग्रजी राजवट आणि स्वातंत्र्यलढा अनुभवलेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या कालपरत्वे कमी होत आहे. या जुन्या-जाणत्या माणसांकडे तो काळ अनुभवलेल्या अनेक महत्त्वपूर्ण आठवणी आहेत. काळाच्या ओघात या आठवणी अधिक अस्पष्ट होत जातील आणि एक दिवस लोप पावतील. या आठवणी आपण शब्दबद्ध करू शकलो तर भविष्याच्या वाटचालीसाठी आपल्याला त्या प्रेरणादायी ठरतील, म्हणून ही ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभव लेखनाची स्पर्धा आयोजित केली आहे.
- शरद बुट्टे पाटील

RAJ1101

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top