राजगुरुनगर नगरपरिषदेत गोंधळ घातल्याने कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजगुरुनगर नगरपरिषदेत
गोंधळ घातल्याने कारवाई
राजगुरुनगर नगरपरिषदेत गोंधळ घातल्याने कारवाई

राजगुरुनगर नगरपरिषदेत गोंधळ घातल्याने कारवाई

sakal_logo
By

राजगुरुनगर, ता. १२ : विविध संदर्भातील माहिती देत नसल्याचा आरोप करून राजगुरुनगर (ता. खेड) नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांवर, एकाने कागद भिरकावले. तसेच, मुख्याधिकाऱ्यांच्या केबीनचा दरवाजा लाथ मारून उघडून त्यांना अरेरावीची भाषा वापरली व त्यांना त्यांचे काम करू न देता सरकारी कामात अडथळा आणल्याचा प्रकार सोमवारी (ता. १०) येथे घडला. त्यामुळे नगरपरिषदेत काही काळ गोंधळ झाला. याप्रकरणी अमितकुमार भरतराव टाकळकर (रा. शिक्षक सोसायटी, वाडा रोड, राजगुरुनगर, ता. खेड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांना अटक केली असून, दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार नगरपरिषद विविध संदर्भातील माहिती देत नसल्याचा आरोप करून टाकळकर यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतर नगरपरिषदेने त्यांच्या अर्जावर योग्य ती कार्यवाही चालू असल्याचे पत्र त्यांना दिले होते. पण, त्यांनी ते घेतले नाही. सोमवारी ते नगरपरिषदेत आले. त्यांच्या इशाऱ्यामुळे पोलिस आधीच तेथे हजर होते. पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी त्यांचे न ऐकता मुख्याधिकाऱ्यांकडे गेले. त्यांनी माहिती दिल्यानंतरही त्यांच्यावर कागद भिरकावले. नंतर पोलिसांनी त्यांना बाहेर नेले. तरी पुन्हा ते केबिनच्या दरवाजाला लाथ मारून केबिनमध्ये गेले व मुख्याधिकाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरली व त्यांना त्यांचे काम करू दिले नाही. त्यांच्याकडे पिशवीत पेट्रोलच्या बाटल्या होत्या, असेही समजले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व गुन्हा दाखल करून अटक केली. याबाबतचा पुढील तपास फौजदार वर्षाराणी घाटे या करीत आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top