बचत गटांना व्यवसायासाठी सहकार्य करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बचत गटांना व्यवसायासाठी सहकार्य करणार
बचत गटांना व्यवसायासाठी सहकार्य करणार

बचत गटांना व्यवसायासाठी सहकार्य करणार

sakal_logo
By

खेड शिवापूर, ता. २४ : ‘‘बचत गट निर्मित वस्तूंसाठी बाजार उपलब्ध असणे, हा खूप मोठा प्रश्न आहे. मात्र, सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी करार करण्यात आला आहे. त्यानुसार बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचे काम विद्यापीठाचे विद्यार्थी करतील. विविध उत्पादने निर्मितीसाठी व विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी बचत गटांना आवश्यक परवानग्या, दाखले मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषद सहकार्य करेल,’’ अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
खोपी (ता. भोर) येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियान (पुणे), अभियान व्यवस्थापन कक्ष भोर अंतर्गत स्वप्नपूर्ती महिला ग्रामसंघ यांनी सुरू केलेल्या ‘ड्रीम लाइट एलईडी प्रा. लि.’ या उपक्रमाचे प्रसाद यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, सहायक गटविकास अधिकारी कुलदीप भोंगे, खोपीचे सरपंच तुषार कांबळे, उपसरपंच सनी शिवरकर, ग्रामविकास अधिकारी दीपक सुरवसे, मोहन इंदलकर, सुनील मारणे आदी उपस्थित होते.
प्रसाद म्हणाले, ‘‘पुणे जिल्ह्यात सध्या सुमारे २४ हजार महिला बचत गट असून, या बचत गटांच्या माध्यमातून सुमारे अडीच लाख महिला कार्यरत आहेत. बचत गटांच्या माध्यमातून महिलांची मोठी शक्ती निर्माण झाली आहे.’’
यावेळी ड्रीम लाइट एलईडी या प्रकल्पाची माहिती स्वप्नपूर्ती महिला ग्रामसंघाच्या महिलांनी प्रसाद यांना दिली. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. भारती रणदिवे यांनी प्रास्ताविक केले.

००७३२

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top