वाणेवाडी सोसायटीच्या अध्यक्षपदी अभय चव्हाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाणेवाडी सोसायटीच्या
अध्यक्षपदी अभय चव्हाण
वाणेवाडी सोसायटीच्या अध्यक्षपदी अभय चव्हाण

वाणेवाडी सोसायटीच्या अध्यक्षपदी अभय चव्हाण

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. ६ : वाणेवाडी (ता. बारामती) येथील विठ्ठल विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी अभय गजानन चव्हाण यांची; तर उपाध्यक्षपदी प्रशांत यशवंत मुळीक यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सन १९६० पासून विठ्ठल सोसायटीच्या निवडणुका बिनविरोध करण्यात येत आहे. यावेळीही ज्येष्ठ ग्रामस्थांनी एकत्र बसून एकमताने संचालक मंडळ निवडत तरुणांकडे सत्ता सोपवली. याप्रसंगी युवा नेते दुष्यंत चव्हाण, दत्तात्रेय चव्हाण, देशराज चव्हाण, गोरख चव्हाण, बाबूराव चव्हाण, भगवान चव्हाण, वसंत चव्हाण, रोहिदास सकुंडे, बाळासाहेब जाधव, आबासाहेब चव्हाण, अशोक मुळीक, कृष्णराव चव्हाण, अशोक पवार, कुमार चव्हाण, संजय चव्हाण आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. ए. देवकाते होते. त्यांना सचिव कल्याण तावरे यांनी सहकार्य केले.

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top