मुरूम सोसायटीच्या अध्यक्षपदी चव्हाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुरूम सोसायटीच्या 
अध्यक्षपदी चव्हाण
मुरूम सोसायटीच्या अध्यक्षपदी चव्हाण

मुरूम सोसायटीच्या अध्यक्षपदी चव्हाण

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. ७ : मुरूम (ता. बारामती) येथील मुरूम विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी संदीप एकनाथ चव्हाण व उपाध्यक्षपदी नंदकुमार शिवलाल सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यानिमित्ताने एका सोसायटीची सूत्रे स्थापत्य विशारदाच्या हाती गेली.
मुरूम सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक अत्यंत लक्षवेधी झाली होती. यामध्ये सोमेश्वर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने तेरा विरुद्ध शून्य, असा संपूर्ण विजय प्राप्त केला होता. राजवर्धन शिंदे, नामदेव शिंगटे, कुमार शिंदे, माऊली कदम, पी. के. जगताप, अविनाश चव्हाण, एन. के. जगताप, फत्तेसिंग चव्हाण, दिनकर कदम या ज्येष्ठ ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी निवडी बिनविरोध झाल्या. मुरूमच्या मल्लिकार्जुन मंदिराच्या उभारणीत संदीप चव्हाण यांची मोलाची मदत झाल्याने त्यांना ही संधी मिळाली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top