द्राक्ष उत्पादकांची नारायणगावात आज बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

द्राक्ष उत्पादकांची नारायणगावात आज बैठक
द्राक्ष उत्पादकांची नारायणगावात आज बैठक

द्राक्ष उत्पादकांची नारायणगावात आज बैठक

sakal_logo
By

नारायणगाव, ता. ११ : द्राक्ष दराबाबतचे धोरण ठरविण्यासाठी बुधवारी (ता. १२) सायंकाळी सहा वाजता येथील कृषी विज्ञान केंद्र सभागृहात जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली आहे, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर, जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांनी दिली.
बिडवई म्हणाले, ‘‘नैसर्गिक आपत्ती व कोरोनाचे संकट या समस्यांमुळे मागील दोन वर्षे द्राक्ष उत्पादक अडचणीत आले आहेत. या वर्षी प्रतिकूल हवामानामुळे द्राक्षाचा एकरी चार ते साडेचार लाख रुपये भांडवली खर्च झाला असून द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाढलेला भांडवली खर्च पाहता द्राक्षाला योग्य भाव मिळणे आवश्यक आहे. काही निर्यातदार व्यापारी करार केल्याप्रमाणे पैसे न देता अंतिम बिल देताना वीस टक्के कमी भाव देवून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. तर काही व्यापारी पैसे बुडवून फरार झाले आहेत. द्राक्ष दराबाबत निश्चिती धोरण ठरवल्यास शेतकऱ्यांची फसवणूक टळणार आहे. बैठकीत उत्पादक शेतकऱ्यांशी द्राक्ष दराबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.’’

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top