
शंभर जणांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ-NPR21B0109
नीरा नरसिंहपूर, ता. १५ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त पिंपरी बुद्रुक येथे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये थायरॉईड, रक्त तपासणी, बीपी, शुगर अशा १०० महिला व पुरुषांची तपासणी करण्यात आली.
पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथील लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालयात खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी माजी सरपंच श्रीकांत बोडके, बबन बोडके, प्रभाकर बोडके, महादेव मगर, सरपंच ज्योती बोडके, उपसरपंच अनुराधा गायकवाड, सदस्य सुनीता शेंडगे, पांडूदादा बोडके, संतोष सुतार, ग्रामसेवक गणेश लंबाते, डॉ. सुमित्रा कोकाटे, प्रियंका पाटील, शहाजी बोडके, रमेश मगर, सोमनाथ कांबळे, बिचकुले, घोगरे आदी उपस्थित होते. डॉ. सुमित्रा कोकाटे, प्रियंका पाटील, आशा सेविका सारिका वाघमारे, स्वाती पाटील, सुरेखा क्षिरसागर, रूपाली चव्हाण, मालन जगताप, चिंतामणी गायकवाड यांनी नागरिकांच्या तपासण्या केल्या.
Web Title: Todays Latest District Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..