अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षे सश्रम कारावास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षे सश्रम कारावास
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षे सश्रम कारावास

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षे सश्रम कारावास

sakal_logo
By

राजगुरुनगर, ता. २४ : आंबेगाव तालुक्यातील दहा वर्षे वयाच्या शाळकरी मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस येथील खेड जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा नुकतीच सुनावली. सनिल ऊर्फ सुनील बबन उधारे ( वय ३१, रा. पेठ पारगाव, ता. आंबेगाव ) असे आरोपीचे नाव आहे.

या खटल्याची थोडक्यात हकिगत अशी की, आंबेगाव तालुक्यातील एका गावातील १० वर्षाची मुलगी, ३ जुलै २०१४ रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास आरोपी सुनील उधारे याने मुलीचा पाठलाग करून पाशवी अत्याचार केला. पीडितेने ही घटना घरी सांगितल्यानंतर घरच्यांनी आरोपी उधारे याच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हा खटला येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायाधीश एस. एन. राजूरकर यांच्या समोर सुरु होता. त्यांनी आरोपीस भा. दं. वि. ३७६ अन्वये १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायदा २०१२ चे कलम ४ अन्वये १० वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड, कलम ८ अन्वये ४ वर्षे सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड, कलम १० अन्वये ५ वर्षे सश्रम कारावास व ३ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top