ब्रेकऐवजी एक्सेलेटर दाबला, मोटार कोसळली विहिरीत!-KND21B0117

शिक्रापूर, ता. १४ : मोटार शिकताना ब्रेकऐवजी एक्सेलेटर जोरात दाबल्याने मोटारीवरील ताबा सुटल्याने मोटार थेट रस्त्याकडेच्या विहिरीत कोसळली. या अपघातात मोटार शिकत असलेल्या महिलेचा महिलेचा मृत्यू झाला, तर तिच्या पतीचा जीव वाचला. वर्षा दीपक आदक (वय ३०, रा. वडगाव पीर, ता. आंबेगाव), असे या अपघात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. हा अपघात मंगळवारी (ता. १४) सकाळी सहाच्या सुमारास करंदी (ता. शिरूर) येथे झाला.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी माहिती दिली की, मोटार शिकायची म्हणून वर्षा आदक या आपले पती दीपक यांच्यासह मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास करंदी हद्दीतील पऱ्हाडवाडी रस्त्यावरून गाडी चालवत-चालवत आल्या. त्यावेळी एक दुचाकी समोरून आलेली दिसल्याने पती दीपक यांनी वर्षा यांना ब्रेक दाबण्यास सांगितले. मात्र, त्यांनी एक्सेलेटरच जोराने दाबला आणि त्यांचा मोटारीवरील ताबा सुटून ते मोटारीसह रस्त्याच्या कडेच्या एका विहिरीत पडले. यावेळी दीपक यांनी काचेतून वर्षा यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी विहिरीत पंपाच्या पाईपला धरून विहिरीच्या वर येत आरडाओरड करून परिसरातील शेतकरी व युवक गोळा केले. त्यांनी वर्षा यांना बाहेर काढले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, शिक्रापूर पोलिस या दुर्घटनेकडे घातपात म्हणूनही पाहत असले, तरी प्राथमिक तपासात अपघात दिसत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com