वरवे येथे कोंडीमुळे मेगाब्लॉक

वरवे येथे कोंडीमुळे मेगाब्लॉक

नसरापूर, ता.३ : नववर्षाच्या स्वागताला पर्यटनस्थळी गेलेल्या प्रवाशांनी सुट्ट्या संपवून पुण्याकडे परतताना पुणे-सातारा महामार्गावरील वरवे (ता.भोर) येथे मोठी वाहतूक कोंडी झाली. रस्त्याचे अपुरे काम व टोलनाका या ठिकाणी मेगाब्लॉक झाल्यामुळे सुमारे सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

रविवार सुट्ट्या संपवून सायंकाळच्या सुमारास प्रवाशी पुण्याकडे निघाल्याने महामार्गावर वरवे (ता.भोर) येथे अर्धवट असलेल्या उड्डाणपुलामुळे अरुंद सेवा रस्त्यावरून वळवलेल्या वाहतुकीवर वाहनांच्या मोठ्या संख्येने वाहतूक कोंडी झाली. वरवे येथून केळवडे ते चेलाडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर टोलनाका येथे मोठ्या वाहनसंख्येने व्यवस्थापन कोलमडून पडले होते. वेळेत टोल भरल्या न गेल्याने टोलनाक्यापासून शिवरेपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या दोन्ही मेगाब्लाँकने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. काही वाहने उलट्या बाजूने पुढे जाण्याचा प्रयत्न करत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडली.

महामार्ग वाहतूक पोलिस राजगड पोलिस महामार्गावर वाहतूक नियंत्रण करण्यासाठी उपस्थित होते. वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अस्लम खातिफ यांनी माहिती देताना सांगितले कि, वरवे येथे महामार्गाच्या कामामुळे वाहतूक संथ होत असल्याने कोंडी होत आहे. मात्र, टोल नाक्यावर प्रचंड गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी होत आहे. वाहनांची जास्त संख्या झाल्यावर टोलशिवाय वाहने सोडण्यात येऊन वाहतूक मोकळी केली.

02164

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com